एकाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेले असू शकते या सगळ्या गट क्रमांक मधील शेतजमीन ची माहिती एकत्रितपणे म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदविले असते.
आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा 8- अ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केले आहे त्यामुळे आता तुम्हाला 8- अ काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
Digital satbaara महाभुमी पोर्टलवर आपण डिजिटल स्वाक्षरी केले 7/ 12 ,8a e ferdar utara आणि प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक काढू शकतो. डिजिटल सातबारा महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाऊनलोड करू शकतो. Digitally signed 7 /12,8A आणि प्रॉपर्टी कार्ड सरकारी आणि कायदेशीर बाबीसाठी वापरता येतील.
आपल्याला आपला मालकीच्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी तलाठी कार्यालयात सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही आपल्या मालकीच्या जमिनी संबंधित माहिती जसे गावानुसार नंबर 8 अ सातबारा उतारा मालमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.
गाव नमुना नंबर 7 /12 उतारा कसा बघावा?
- ऑनलाइन विना स्वाक्षरीत सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईटवर ओपन करावे .
- आपला विभाग निवडा.
- सातबारा उतारा चा शोध घेण्यासाठी वेबसाईटवर आपल्याला सर्वे नंबर, गट नंबर, अक्षरे सर्वे नंबर, गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय दिसतात. आपल्याला गावातील एकूण नाव म्हणजे संपूर्ण गावातील सातबारा याची यादी पाहायची असेल तर संपूर्ण नाव पहा पर्याय निवडा.
- या ठिकाणी सर्वात सोपा पर्याय नंबर, गट निवडा.
- गट नंबर सर्वे नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करा.
- आपला योग्य गट नंबर सर्वे नंबर निवडा मध्ये अ, ब, क किंवा एक दोन तीन असे पर्याय असतात.
- सातबारा उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी नोंदणी पाहण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर योग्य पद्धतीने टाईप करा.
- Captcha योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व verify captcha to view 7 /12 वर क्लिक करा.
- या ठिकाणी गावानुसार सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 सातबारा आपल्यासमोर येईल.
- भूलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी वापरता येणार नाहीत.
- कायदेशीर अथवा शासकीय बाबीसाठी वापरण्यासाठी 8 अ उतारा महाभूमी वेबसाईटवर digital satbaara.mahabhumi.gov.inमिळेल.
8अ उतारा जवाबंदी पत्रक online बघा
- ऑनाइन 8 अ उतारा उतारा पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे महाभूमी वेबसाईट digital satbaara. mahabhumi.gov.in ओपन करा.
- आपला विभाग निवडा.
- योग्य विभाग निवडल्यानंतर जिल्हा तालुका गाव निवडा.
- आपला खाते नंबर पहिले नाव, मधील नाव ,आडनाव संपूर्ण, नाव यापैकी कोणत्याही एकाची निवड करा.
- 8 अ नोंदणीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर लिहा 8अ पहा त्यावर क्लिक करा.
- कॅपच्या योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा verify captcha to view 8A वर क्लिक करा.
- आपल्यासमोर गाव नमुना 8 अ धारण जमिनीची नोंदणी आसामी वार खता वनी जमाबंदी पत्रक दिसत आहे.
- कायदेशीर अथवा शासकीय बाबीसाठी वापरण्यासाठी आठ अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड कसे पहावे?
- मालमत्ता पत्र (property card) ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट digital satbara mahabumi gov in. लॉगिन करा.
- Online property card पाहण्यासाठी विभाग निवडा
- योगी विभाग निवडल्यानंतर जिल्हा तालुका गाव निवडा
- CTS no/ न. भु. न, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, शोधा यापैकी कोणत्याही एकाची निवड युद्ध पद्धतीने करा.
- मालमत्ता पत्रक ऑनलाईन पाहण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा
- डिजिटल स्वाक्षरी फेरफार प्राप्त करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला पंधरा रुपये करावे लागतील .
- डिजिटल स्वाक्षरी केलेला प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रकाचा वापर सर्वाधिकृत आणि कायदेशीर बाबीसाठी केला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा digitally signed online फेरफार कसे पहावे आणि डाऊनलोड करावे ?
- स्वाक्षरी फेरफार उतारा signed eFerfar प्राप्त करण्यासाठी digital satbara mahabumi gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
- नंतर जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation no) निवडा.
- डिजिटल स्वाक्षरी फेरफार (digitally signed 7/12) प्राप्त करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला पंधरा रुपये भरावे लागतील.
- खाली दिलेल्या डाउनलोड बटन दाबा आणि डिजिटल इसाईन फेरफार डाऊनलोड करा.
- ई फेरफार डाऊनलोड नाही झाले तर पेमेंट हिस्टरी या ॲक्शन वर जा व तेथून डाउनलोड करा.