Land measure app: भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीसाठीची जमीन कधी सर्वदूर सरळ असते कधी वाकडी तिकडी, वर खाली, ओबडधोबड. त्यामुळे जमिनीची मोजणी करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आणि अशा कारणांमुळे कधी कधी त्यामध्ये जमिनीचा वाद देखील उद्भवतो. अशा परिस्थितीत कायदेशीर रित्या जमीन मोजणी करावयाचे असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी अर्ज करावा लागतो. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरवण्यात आलेल्या दरानुसार एकरी रक्कम भरावी लागते.अशा काही आर्थिक अडचणीमुळे शेतकरी माघार घेतात आणि त्यांच्या जमिनीची मोजणी राहून जाते. मग शेतकऱ्यांना गाव पातळीवर फक्त आपली जमीन किती आहे? याबाबत तपासणी करावयाची असल्यास आम्ही या लेखाच्या माध्यमातून अत्यंत सोपी पद्धत घेऊन आलो आहोत.
Land measure app
जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करत असाल किंवा तुमच्या शेत जमिनीची मोजणी करायची असेल तर तुम्ही मोबाईल ॲप द्वारे देखील करू शकता. यासाठी फक्त मोबाईल मध्ये तुम्हाला ॲप डाऊनलोड करावे लागतील ज्यांच्या मदतीने तुम्हाला जमीन किंवा प्लॉटच्या दिशेची माहिती मिळवून जाईल. इथे आपण मोबाईल वरून जमीन कसे मोजतात तसेच, जमिनीची दिशा जाणून घेण्याची पद्धत देखील पाहू.शेतीची मोजणी करण्यासाठी तुम्ही काही ॲप्स वापरू शकता चला पाहूया ते कसे वापरायचे.
जमीन मोजणी ॲप ची गरज काय?
अनेक ठिकाणी शेत जमिनीच्या बांधावरून वाद निर्माण होतात, अशा वेळेस जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्जाची मंजुरी झाल्यानंतर जमिनीची मोजणी होते पण मी खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि यामध्ये खूप वेळ जातो. परंतु आपण मोबाईलच्या माध्यमातून काही मिनिटांमध्येच मोजणी करू शकतो. या ॲपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये त्याच बरोबर जमीन मोजणी करण्यासाठी कोणत्याही अर्जाची व कागदपत्राची आवश्यकता नसते. म्हणून देशामध्ये अशा जमीन मोजणी ॲप ची आवश्यकता आहे.
जमीन मोजणी कॅल्क्युलेटर फायदे:
भारतासारख्या विविध असलेल्या देशात राहत असल्या देशभरातील व्यक्ती भौगोलिक क्षेत्रात रूपांतर मापनाबाबत परिपूर्ण असू शकत नाहीत. मॅन्युअल कॅल्क्युलेशन द्वारे अवलंबून आणि कठीण असू शकतो कारण त्यातून त्रुटी मुक्त परिणाम येईलच असे नाही. कोणत्याही प्रॉपर्टी किंवा जमिनीचे मूल्यांकन करण्यासंदर्भात अचूक निष्कर्ष करण्यासाठी तुम्हाला land area calculator फायद्याचे ठरेल.
- हे टूल-त्रुटी मुक्त त्वरित कॅल्क्युलेशन सुनिश्चित करते.
- जमिनीच्या वास्तविक मूल्यांकनाविषयी निर्णय घेण्यास मदत करते.
अनियमित जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजावे?
अनियमित जमीन हे एक अनियंत्रित जमीन स्वरूप आहे. जे एक समान नाही. अशा जमीन बाबांसाठी जमीन मोजमाप कॅल्क्युलेट करण्यास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सूत्रे आहेत.क्षेत्रफळाचे त्रिकोण,आयत, चौरस ,वर्तुळ किंवा समांतरभुज चौकोन यासारख्या परिचित आकारांमध्ये विभाजन करा त्यानंतर त्यांचा वैयक्तिक फॉर्मुला वापरून क्षेत्रफळ मोजा.
अशा पद्धतीने तुम्ही त्रास मुक्त परिणाम मिळण्यासाठी जमीन क्षेत्रफळ कॅल्क्युलेटर ऑनलाईन वापरू शकता.
जमीन मोजण्याची एकके:
भारतात जमीन मोजण्यासाठी अनेक मापन आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रदेशांचा बदलतात. भारतातील लोकप्रिय जमीन नापनाचे संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे:
- एकर
एकर हे युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी लोकप्रिय जमीन मापन आहे. हे एकक भारतामध्ये देखील वापरले जाते.
- हेक्टर
अधिकांशतः हे एकक कृषी किंवा वन जमीन मोजण्यासाठी वापरले जाते.
- बिघा
बिघा हे पंजाब हरियाणा बिहार उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड गुजरात आणि राजस्थानच्या भागांमध्ये जमीन मोजण्याचे पारंपरिक एकक आहे. हे मोजमाप राज्यानुसार बदलते.
- चौरस फूट
हे जगभरात सामान्यपणे वापरले जाणारे प्रमाणित मापन एकक आहे. चौदास फूट म्हणजे प्रत्येक बाजूला फक्त एक फूट उंच असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून परिभाषित केले जाऊ शकते.
- चौरस मीटर
हे स्टॅंडर्ड इंटरनॅशनल आधारित जमिनी क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे ज्या स मीटर स्क्वेअर म्हणूनही ओळखले जाते.
या एककाव्यतिरिक्त संपूर्ण भारतातील विविध प्रदेशांमध्ये इतर जमीन मोजमापे एकके देखील वापरले जातात.
- कनल
- घुमाऊ
- बिस्वानसी
- किल्ला
- अंकनम
- सेंट
- गुंठा
- कुंचम
सदर लेखांमध्ये मोबाईल द्वारे जमीन मोजणी कशी करावी, त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने मोजणी करता येते हेही अगदी विस्तृत स्वरूपात पाहिले आहे. आशा करतो की, तुम्हाला ही माहिती फायदेशीर ठरेल.