व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

PMEGP योजना, असा करा ऑनलाईन अर्ज-जाणून घ्या|  Pradhanmantri Employment Generation Scheme

उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पण पैशाची म्हणजेच भांडवलाची अडचण असणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज तसेच निवड आणि खात्यात रक्कम जमा होणे हे सगळं यंत्रणेद्वारे होत. ही प्रक्रिया पारदर्शक आहे असा दावा सरकार करत .नक्की ही योजना आहे तरी काय कोणाला कर्ज मिळतं? त्यासाठी काय निकष आहेत? कसा अर्ज करायचा?आणि योजना लागू होण्यासाठी काय अटी आहेत का? चला तर मग सगळे तपशील समजून घेऊया.

Pradhanmantri employment generation scheme:(PMEGP) काय आहे?

देशातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे, बेरोजगारी खूप वाढत आहे. आणि त्याचमुळे शिक्षण होऊन ही मुलांना रोजगार नाही मिळत. ग्रामीण तसेच शहरी भागातील कामाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ही योजना आणली आहे.

या आधी  रोजगार संदर्भात सरकारच्या दोन योजना होत्या

1. प्रधानमंत्री रोजगार योजना

2. रुरल एम्प्लॉयमेंट क्रिएशन स्कीम (Rural Employment Creation Scheme)

या दोन योजना एकत्रित करून प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम ही योजना तयार करण्यात आलेली आहे.

परतफेड कालावधी:

पीएमईजीपी लोन स्कीम अंतर्गत 36 महिने ते 84 महिन्यापर्यंत परतफेड कालावधी मिळत असतो. परतफेड कालावधी हा वेगवेगळ्या प्रकल्पावर अवलंबून असतो.

योजनेची उद्दिष्टे

  • नवीन स्वयंरोजगार उपक्रम /लघुउद्योग स्थापन करून देशाच्या शहर आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  • कारागिरांची दैनंदिन कमाई क्षमता वाढवणे आणि ग्रामीण आणि शहरी रोजगार दर वाढविण्यात योगदान देणे.
  • ग्रामीण आणि शहरी बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर एकत्र आणणे आणि त्यांना शक्य तितक्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • ग्रामीण आणि शहरी बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर सतत आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे.
हे वाचा-  Aadhar Card Loan 2024-आता आधार कार्ड वरून मिळणार दोन लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज

PMEGP कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • प्रकल्प अहवाल
  • अर्जदाराची ओळख आणि पत्ता पुरावा
  • पॅन कार्ड, आधार कार्ड आणि अर्जदाराची आठवी पास प्रमाणपत्र
  • आवश्यक असल्यास विशेष श्रेणी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह रीतसर भरलेला अर्ज
  • उद्योजक विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • जातीचे/माजी सैनिक/ PHC साठी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र,असल्यास

PMEGP कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी, PMEGP च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा

2. ऑनलाइन PMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा.

3. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर माहिती जतन करण्यासाठी ‘Save Applicant Deta’ वर क्लिक करा.

4. तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या अंतिम सबमिशन साठी सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

5. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या/तिच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवला जाईल.

PMEGP कर्जासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

1. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.

2. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज मसुदा म्हणून जतन करा.

3. अर्जाची प्रिंट आऊट घ्या.

4. अर्जाची प्रिंट आऊट जवळच्या बँकेत सबमिट करा.

5. संबंधित बँकेला आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करा.

How to check:PMEGP कर्ज कर्जाची स्थिती

1.PMEGP च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा या लिंक वर क्लिक करा.

हे वाचा-  Aadhar Card Loan 2024-आता आधार कार्ड वरून मिळणार दोन लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज

http://Kviconline.gov.in/pmegp/

2.नवीन पृष्ठ उघडण्यासाठी नोंदणीकृत अर्जदारासाठी लॉगिन फॉर्म वर क्लिक करा.

3. तुमचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा आणि लॉगिन वर क्लिक करा.

4. शेवटी तुमच्या PMEGP कर्ज  अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला ‘स्थिती पहा ‘वर क्लिक करावे लागेल.

PMEGP योजनेअंतर्गत संभाव्य प्रकल्प

  • कृषी आधारित अन्नप्रक्रिया
  • अन्नप्रक्रिया उद्योग
  • दुग्धजन्य पदार्थ
  • वन उद्योग
  • कागद आणि संबंधित उत्पादने
  • रसायने/ पॉलिमर आणि खनिजे
  • सेवा क्षेत्रातील उद्योग
  • कापड आणि पोशाख
  • कचरा व्यवस्थापन लहान व्यवसाय मॉडेल
  • लहान व्यवसाय मॉडेल

Leave a Comment