व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Google maps वर सहज ऍड करू शकता तुमचे घर, दुकान आणि ऑफिस

गुगल मॅप्स जगभरातील एक लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. त्याचा वापर फक्त अनोळखी ठिकाणांचे लोकेशन शोधण्यासाठी केले जात नाही तर तुम्हाला तिथे जाण्याचा रस्ता बघण्यासाठी देखील केला जातो. रोज कोट्यावधी लोक याच निवेगेशन सर्विस चा वापर करतात. तसेच अनेक लोक गुगल मॅप वर आपल्या कामाची जागेची माहिती अपडेट करतात. गुगल मॅप्स वर बिझनेस चा पत्ता असतो, त्यामुळे लोकांना तिथे पोहोचण्यास मदत होते, तसेच बिझनेस वाढवण्यास देखील मदत होते.

याखेरीज छोटे किराणा व्यवसायिक किंवा हॉटेलांना त्यांचे ग्राहक कुठल्या भागात आहेत, हे दाखवणारे तंत्रज्ञान ही ‘गुगल मॅप’आणत आहेत. एखाद्या भागात दुकान सुरू करायचे असल्यास ते ते ग्राहक मिळतील का, याचे सर्वेक्षण गुगल मॅप च्या आधारे करता येईल. त्या संबंधित भागात कुठल्या प्रकारचे ग्राहक राहतात, त्यांची आवड काय, त्यांची मिळकत किती, आधी माहितीचे सर्वेक्षण आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे गुगल मॅप करता येईल.

Google मॅप्स वर तुम्ही एखादे ठिकाण किंवा शॉप देखील सर्च करू शकता. तुम्ही एखाद्या जागेचा देखील यामध्ये समावेश करू शकता. गुगल मॅप्स मध्ये यासाठी सुविधा उपलब्ध असून, एखाद्या मिसिंग प्लेसला तुम्ही गुगल मॅप वर ऍड करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. काही डिवाइस वर तुम्ही घरात वा अपार्टमेंटला देखील ऍड करू शकता.

गुगल मॅप्स वर घराचा पत्ता अपडेट करण्याची पद्धत

  • गुगल मॅप्स ॲप ओपन करा.
  • Manage your Google account वर जा.
  • म्हणजे तुम्ही गुगल अकाउंट वर पोहोचाल, तिथे personal info ची निवड करा.
  • इथे तुम्हाला addresses ऑप्शन मिळेल.
  • ज्यामध्ये Home ,work आणि other addresses चा ऑप्शन मिळेल.
  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार घर ऑफिस दुकान इत्यादी पत्ते अपडेट करू शकता.

मॅप वर तुमच्या घरचा पत्ता कसा शोधाल?

सर्वप्रथम गुगल मॅप उघडा.

यानंतर, पत्ता शोधण्यासाठी वरच्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात शोध बार  पर्याय वापरा.

यानंतर साईड बार मध्ये ऍड मिशन प्लेस चा पर्याय दिसेल.

यानंतर तुम्हाला घर,पत्ता,लोकेशन कॅटेगरी असे लोकेशन चे नाव जोडावे लागेल.

त्यानंतर सबमिट पर्यायावर  टॅप करावे लागेल.

बिझनेस चा पत्ता अपडेट करण्याची पद्धत

टीप: गुगल मॅप वर बिझनेस चा पत्ता जोडण्यासाठी तुमच्याकडे गुगल बिजनेस प्रोफाईल असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रोसेस करता येईल.

  • गुगल मॅप ॲप ओपन करा.
  • मॅप वर खाली contribute ऑप्शन सिलेक्ट करा.
  • त्यानंतर add place ऑप्शन वर जा.
  • Is this your business?वर टॅप करा.
  • त्यानंतर क्रोम ब्राउझर वर एक पेज ओपन होईल.
  • जिथे तुम्हाला व्यवसायाचे नाव, प्रकार इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • मोबाईल नंबर दर्ज टाका. तुमच्याकडे OTP येईल तो सबमिट करून verification प्रोसेस पूर्ण करा.
  • पुढे जाऊन बिझनेस लोकेशन सेट करा.
  • कार्यालयीन वेळ, वेबसाईट ची माहिती टाका.
  • ऑफिसचे फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर बिजनेस ऍड्रेस ऍड करण्याची रिक्वेस्ट सबमिट करा.
  • Google जेव्हा तुमची रिक्वेस्ट  verify करेल तेव्हा गुगल मॅप्सवर तुमचा बिजनेस ऍड्रेस दिसू लागेल. अशाप्रकारे तुम्ही सहज बिजनेस ऍड्रेस गुगल मॅप्स वर जोडू शकता.

Leave a Comment