व्हॉट्सॲप ग्रुप

मोबाईल वरून करा जमिनीची मोजणी तेही फक्त पाच मिनिटांत | Land Area Calculator App Download

नमस्कार, आपण सदर लेखांमध्ये मोबाईल द्वारे जमीन मोजणी कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जमीन मोजणी करण्यासाठी कोण कोणत्या ॲपचा वापर केला जातो याविषयीची आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

चला तर मग पाहूया मोबाईल वरून जमीन मोजणी करण्यासाठी कोणकोणती एप्लीकेशन आहेतअनेक वेळा जमीन मोजणीवरून वाद झाल्याचे खूप मोठी प्रकरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसून येत असतात. शेत जमीन असो किंवा बिगर शेत जमीन वाद हे प्रत्येक वेळी होताना दिसून येतात. असे वाद होतात तेव्हा शासनाकडून जमीन मोजणी करून घेतली जाते. परंतु शासनाकडून जमीन मोजणी करून घेताना खर्च जास्त येतो आणि वेळ देखील खूप लागतो. यावर उपाय म्हणून जमीन मोजणी करण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजता येते. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजण्याचे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जमीन मोजणीसाठी कोणत्याही कागदपत्राची व अर्जाची गरज नाही.

मोबाईल द्वारे आपणाला जमीन मोजणी करण्यासाठी कोणते ॲप डाऊनलोड करावे लागेल व ते कसे डाउनलोड करायचे त्याच बरोबर डाऊनलोड केलेले ॲप मधून कशा पद्धतीने जमीन मोजणी करायची, त्याचबरोबर भारतामध्ये जमीन मोजणी ॲपची आवश्यकता का आहे? शेत जमीन मोजण्याची परिमाणे याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहणार आहोत.मोबाईल ॲप वरून जमीन मोजणी करा

जमीन मोजणी ॲप ची आवश्यकता का आहे

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील सुमारे ५५% लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. शेतजमिनीवरील एक मोठ्या क्षेत्रामध्ये एकाच प्रकारचे पीक घेतले जाते त्यामुळे अनेकदा जमिनीचे सीमा विषयांचे वाद उद्भवतात. अशावेळी जमिनीच्या हिस्सेदारामध्ये जमीन मोजणी करणे आवश्यक ठरते. अशावेळी शासकीय पद्धतीने जमीन मोजणीवर अवलंबून राहून जमीन मोजणीच्या उपक्रमासाठी खर्च आणि वेळ देखील खूप लागतो त्यामुळे देशामध्ये जमीन मोजणी ॲप हे अत्यंत उपयुक्त ठरते. या ॲपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये त्याचबरोबर जमीन मोजणी करण्यासाठी कोणत्याही अर्जाची व कागदपत्राची आवश्यकता नसते. म्हणून देशांमध्ये अशा जमीन मोजणी ॲपची आवश्यकता आहे.

हे वाचा-  भांडी संच योजना 2025: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत घरातील भांडी, असा करा अर्ज संपूर्ण माहिती

Land area calculator app (जमीन क्षेत्रफळ कॅल्क्युलेटर ॲप)

जमिनीची मोबाईलवर मोजणी करण्यासाठी सर्वप्रथम आपणाला ल्याड एरिया कॅल्क्युलेटर एप्लीकेशन हे आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. या ॲपद्वारे आपणाला शेतजमीन मोजणी साठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा अर्जांची गरज नाही. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती शेतजमीनीची पाच मिनिटांमध्ये मोजणी करू शकतो.

जमीन एरिया कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजणी करण्याचे दोन पर्याय आहेत.

  • पहिला पर्याय म्हणजे शेत जमिनीच्या बांधावरून चालत जाऊन जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी कमी करता येते.
  • . दुसरा पर्याय म्हणजे गुगल मॅप मध्ये शेत जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करता येते.

Google map calculator (गुगल मॅप वरून जमीन मोजणी)

Google map calculator द्वारे ही शेत जमीन मोजणी करता येते. यामध्ये तुमच्या मोबाईल मधील गुगल मॅप मध्ये जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करता येते.

Google map calculator मोबाईल मध्ये डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करा.त्यानंतर त्यामध्ये Google map calculator सर्च करा.
  • या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यामध्ये GPS area calculator हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलचा GPS सुरू करा.
  • जीपीएस सुरू केल्यानंतर GPS area calculator हे ॲप उघडा.
  • मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण नकाशा दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे ठिकाण तुमचे राज्य जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
  • सर्च केलेला नकाशा समोर दिसल्यानंतर तुमच्या जवळच्या नकाशावर तुमच्या जमिनीच्या चारी बाजू सिलेक्ट करा.
  • या Application मधील जमीन मोजणीची परिमाण निवडून तुम्हाला जमीन मोजणी करता येते.
  • अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन मोजताना ही आपलिकेशन मधील square feet किंवा ‌square metre या परिमाणाची निवड करा.
  • या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची किंवा इतर कोणाचीही जमीन सहजपणे मोजता येते.
  • जमीन मोजणीसाठी तुम्हाला हेक्टर मध्ये मोजण्यासाठीचे परिणाम सुद्धा निवडता येते.
हे वाचा-  स्वतःचा दुध व्यवसाय सुरू करायचा असला तर 13 लाखांचे कर्ज 4.50 लाखांचे अनुदान

Land area calculator app आणि Google map calculator च्या माध्यमातून आपणाला शेतजमीन मोजणे खूपच सोपे आहे. त्याचबरोबर कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये शेत जमिनीची मोजणी मोबाईल द्वारे अचूक स्वरूपात करता येते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेत जमीन मोजणी ही दोन प्रकारे करता येते. यापैकी पहिल्या प्रकारामध्ये शेत जमिनीच्या बांधावरून चालत शेत जमिनीला वेढा घालून जमिनीची संपूर्ण मोजणी कमी वेळेत कमी खर्चामध्ये आणि अचूक स्वरूपात करता येते. दुसरा प्रकार म्हणजे गुगल मॅप मध्ये जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द निवडून जमिनीची मोजणी करता येते या दोन्ही पद्धती खूपच सोपे आहेत.

जमीन मोजण्याची परिमाणे

जमीन मोजण्याच्या परिमाणामध्ये १ एकर मध्ये ४० गुंठे असतात. ३३ × ३३ फूट जमिनीतून १ गुंठा तयार होतो. १ गुंठा १०८९ चौरस फुटाचा असतो. १ एकराचे चौरस फुटामध्ये रूपांतर करायचे असल्यास ४३५६० चौरस मीटर इतके होते.२.४७ एकर जमिनीचा १ हेक्टर बनतो. याचे रूपांतर गुंठ्यामध्ये करायचे असल्यास ९८.८ गुंठे इतके होते. एक हेक्टर चे चौरस फुटामध्ये रूपांतर करायचे झाल्यास १०७६३६ चौरस फूट इतके होते.आपण सदर लेखांमध्ये मोबाईलद्वारे जमीन मोजणी करण्यासाठीची कोणती ॲप आहेत ती पाहिली आहेत. त्याचबरोबर या ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने मोजणी करता येते हेही अगदी विस्तृत स्वरूपात पाहिले आहे. यांच्या माध्यमातून मोजणी करणे किती सोपे त्याचबरोबर पैसे व वेळेची बचत होते याची माहिती आपण पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद!

हे वाचा-  मोबाईल मधून घरासाठी अर्ज करा, सरकारने बनवलेल्या ॲपमधून योजनेचा लाभ घ्या

Leave a Comment