CIBIL SCORE : अनेक वेळा आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. उदाहरणार्थ, शिक्षण,लग्न,घरी वैद्यकीय आणीबाणी आहे किंवा घर बांधावे लागेल किंवा जमीन खरेदी करावी लागेल. अशा परिस्थितीत आपण सहसा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करतो. आणि आम्हा सर्वांना माहित आहे की कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबिल स्कोर तपासतात. आणि जर तुम्हाला सोपे कर्ज हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला CIBIL स्कोर म्हणजेच CREDIT Score चांगला राखावा लागेल.
पण तुम्हाला माहिती आहे का? सिबिल स्कोर कोणी आणि कसा तयार केला आहे? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ही महत्त्वाची गोष्ट…
CIBIL स्कोअर चे महत्व- (CIBIL SCORE importance)
अनेकदा जेव्हा क्रेडिट स्कोर घेण्याबाबत चर्चा होते किंवा CIBIL Score उल्लेख प्रथम केला जातो. बँका तुमचं सिबिल स्कोर पाहून ठरवतात की त्यांनी तुम्हाला कर्ज द्यावे की नाही.याशिवाय कर्जाच्या व्याज दरावरही त्याचा परिणाम होतो. म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कधी सहज आणि चांगल्या व्याज दरात कर्ज मिळते.
परंतु CIBIL फार चांगले नसतील तर कर्ज मिळणे अवघड होते आणि ते उपलब्ध असल्यास त्यावर जास्त व्याज आकारले जाते. पण हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का की, क्रेडिट स्कोर म्हणजे /सिबिल स्कोर काय आहे कोणत्या आधारावर तयार केला जातो आणि कोण तयार करतो? त्याबद्दल येथे तपशीलवार जाणून घेऊया…
तुमचा CREDIT अहवाल कोण तयार करतो ते जाणून घ्या:
सर्व क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट रिपोर्ट जारी करतात. यापैकी, ट्रान्स युनियन CIBIL,Equifax,Experian आणि CRIF Highmark सारख्या क्रेडिट माहिती कंपन्या लोकांच्या आर्थिक नोंदी गोळ्या करण्यात गुंतलेल्या आहेत आणि या डेटावर आधारित क्रेडिट रिपोर्ट/एडिट स्कोर तयार करण्यासाठी परवाना मिळवतात.
हे क्रेडिट ब्युरो बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांकडे जमा केलेल्या ग्राहकांच्या डेटा चे मूल्यांकन करतात जसे की थकीत कर्जाची रक्कम, परतफेड नोंदी,नवीन कर्ज/ क्रेडिट कार्ड साठी अर्ज आणि इतर क्रेडिट संबंधित माहिती इत्यादी आणि त्यावर आधारित सिबिल स्कोर तयार करतात.
CIBIL स्कोर तयार करताना हे घटक विशेषत: विचारात घेतले जातात
1. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कर्ज किंवा Credit कार्ड घेता तेव्हा तुमचा सुरुवात होते.सिबिल स्कोर तयार करताना, पहिला विचार तुमचा क्रेडिट इतिहास आहे. याद्वारेच आपल्याला कळू शकते की तुमचा क्रेडिट इतिहास किती जुना आहे आणि तुमचा परतफेडीचा रेकॉर्ड कसा आहे? या क्रेडिट इतिहासाचा तुमच्या सिबिल स्कोरवरही परिणाम होतो.
2. सिबिल स्कोर तयार करताना तुमचा CUR म्हणजेच credit Utilisation ratio देखील विचारात घेतला जातो. CUR म्हणजेच तुम्ही किती टक्के credit मर्यादेचा वापर केला आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापर करते असाल तर तुमच्या कार्ड मर्यादेपैकी फक्त 30 टक्के वापरा. क्रेडिट कार्ड आणि मोठी खरेदी करणे टाळा. उच्च क्रेडिट वापर गुणोत्तर दर्शवते की क्रेडिट कार्ड वरील तुमचे अवलंबित व खूप जास्त आहे याचा तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो.
3. तुमचा सिबिल स्कोर तुम्ही यापूर्वी किती असुरक्षित कर्जे आणि किती सुरक्षित कर्ज घेतले आहेत यावरून ठरवले जाते. जर तुम्ही असुरक्षित कर्जे जसे की पर्सनल लोन क्रेडिट कार्ड इत्यादी अनेक वेळा घेतली असतील, तर तुमच्याकडे पैशाची कमतरता असल्याची दिसून येते. आणि किडीतवर तुमचे अवलंबित व खूप जास्त आहे.
त्याचवेळी, जर तुम्ही आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि सुरक्षित कर्ज घेत असाल आणि ते सर्व वेळेवर भरले असेल तर ही दर्शवते की तुम्ही सर्व प्रकारच्या कर्जाची व्यवस्थापन करणे सक्षम आहात. अशा स्थितीत तुमचे क्रेडिट मिक्स संतुलित राहते.
4. CIBIL SCORE तयार करताना, काही इतर गोष्टींचा देखील विचार केला जातो जसे की तुम्ही कर्जाची पूर्तता केली आहे की नाही, तुम्ही एखाद्याच्या कर्जाची जामीनदार आहात आणि परत केले जात नाही, तर तुमच्या क्रेडिट रेकॉर्डला त्रास होतो आणि त्याचा थेट परिणाम सिबिल स्कोर वर होतो.
सिबिल स्कोर असा वाढवा| Increase Your CIBIL SCORE
तुमचा क्रेडिट स्कोर खराब झाला असेल तर त्याचा परिणाम सिबिल स्कोर वर होतो. कोणतेही कर्ज असेल तर सिबिल स्कोर हा चांगलाच असावा लागतो. तुमचा सिबिल स्कोर जितका चांगला तितकी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असे समजले जाते. परंतु अनेक वेळा काही कारणांमुळे क्रेडिट स्कोर खराब होतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो. हा सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी खालील माहिती तपासून पहा.
- कर्ज किंवा इतर कोणत्याही ईएमआय, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरा. यामध्ये निष्काळजीपणा करू नका.
- क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी करा.
- उच्च क्रेडिट कार्डचे कर्ज लगेचच भरावे लागेल आणि ते तुमचे पहिले प्राधान्य असावे.
- क्रेडिट इतिहास तुमच्या सिबिल स्कोर वर देखील परिणाम करतो . तुमच्याकडे इतिहास जितका जुना असेल तितका चांगला सिबिल स्कोर असतो.त्यामुळे तुमच्याकडे जुनी क्रेडिट कार्ड खाते असतील जे तुम्ही वापरत नाही, तर ते बंद करणे टाळा.
- नवीन कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा कळी रिपोर्ट तपासला जातो .त्यामुळे तुमचा स्कोर कमी होऊ शकतो. त्यामुळे, कमीत कमी कालावधीत एकापेक्षा अधिक कर्जासाठी अर्ज करणे टाळा.
- क्रेडिट रिपोर्ट मध्ये कोणत्याही त्रुटी नाही त्याची खात्री वर्षातून एकदा तरी करा.
लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे उपाय घेण्यामुळे त्वरित सिबिल स्कोर मध्ये फरक पडणार नाही.परंतु, ही धोरणे कृतीमध्ये ठेवल्यानंतर तुमच्याकडे CIBIL SCORE एका वर्षामध्ये वाढ पाहू शकता.