तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे हे पाहून तुमच्या आर्थिक स्थितीचा अगदी अचूक अंदाज लावला जाऊ शकतो. विशेषतः, जर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुमचा डिलीट स्कोर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवतो. त्यामुळे तुमच्यासाठी क्रेडिट स्कोर उत्तम राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण स्वस्त कर्ज कसे मिळवू शकतो? तसेच क्रेडिट स्कोर खराब झाल्यास कसा सुधारू शकतो हे पाहू.
सिबिल स्कोर कमी असेल तर नवीन कर्ज घेण्यास अडचण येईल. जर तुम्ही वैयक्तिक किंवा व्यवसाय करण्यासाठी अर्ज केला असेल तर बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होईल. कर्ज मंजुरी क्रेडिट स्कोर वर अवलंबून असते. कमी स्कोअर मुळे कर्जाच्या रकमेवर ही परिणाम होतो.
What is credit score: credit score म्हणजे काय?
(CIBIL )म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड होय. सन 2000 साली स्थापित झालेल्या या संस्थेकडे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या व कंपन्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंदणी असते. त्यासाठी या संस्थेत अनुक्रमे कंजूमर ब्युरो व कमर्शियल ब्युरो कार्यरत असतात.
क्रेडिट स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. विशेषतः 300 आणि 850 दरम्यान, तुमच्याकडे जोखमीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा तुमची बिले वेळेवर भरण्याची शक्यता दर्शवण्यासाठी डिझाईन केलेली असते.
Credit स्कोर का महत्वाचा आहे?
- कर्जाच्या परतफेड चा इतिहास सिबिल स्कोर वरून ओळखला जातो.
- क्रेडिट स्कोर 300 ते 900 पर्यंत आहे.
- जर तुमचा स्कोर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँका ते चांगले मानतात.
- अर्जदाराची कर्जाची वागणूक तपासली पाहिजे.
- बँका कर्ज देताना सिबिल स्कोर पाहतात.
क्रेडिट स्कोर चे परिमाण:
- उत्तम-800 ते 850
- खूप चांगले-799 ते 740
- छान-739 ते 670
- ठीक-699 ते 580
- वाईट-579 ते 300
सिबिल स्कोर कसा वाढवायचा?|(How to increase CIBIL SCORE)
नियमितपणे सिबिल स्कोर केल्याने तुमच्या स्कोर वर परिणाम होणाऱ्या कोणत्याही त्रुटी किंवा विसंगती ओळखण्यास मदत होऊ शकते.
- वेळेवर लोनचे पेमेंट करा.
तुमचे क्रेडिट कार्ड बिल ,लोन आणि इतर हप्ते वेळेवर भरा.त्यात उशिरा केला तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो.तुमच्या लोन पेमेंटचे रेकॉर्ड जितके चांगले असेल तितका तुमचा स्कोर चांगला होईल.
- नवीन कर्ज घेताना काळजी घ्या
जेव्हा तुम्ही नवीन करण्यासाठी अर्ज करता तेव्हा क्रेडिट रिपोर्ट तपासला जातो. त्यामुळे तुमचा स्कोर थोडा कमी होऊ शकतो त्यामुळे, कमी कालावधीत एकापेक्षा अधिक कर्जासाठी अर्ज करणे टाळा.
- तुमचे ईएमआय वेळेवर परतफेड करा.
तुमची आर्थिक जबाबदारी सध्या ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही बाउन्सिंग ईएमआय टाळण्यासाठी, कृपया देय तारखेच्या आगाऊ तुमचे अकाउंट चांगली देय केले असल्याची खात्री करा.
- कमी कालावधीत जास्तीत जास्त ठिकाणी कर्ज घेऊ नका
- शक्यतो एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा वापर करू नका.
- नियमितपणे तुमच्या स्कोर वर देखील ठेवा.
- क्रेडिट मर्यादा वाढवण्यासाठी विचारा.
- क्रेडिट कार्डची मर्यादा पुन्हा पुन्हा वाढवू नका.
- कर्जाचे जामीनदार होण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.