व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Jaminiche Bakhshish Patra जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? कशासाठी असते महत्वाचे आणि ते कसे करायचे जाणून घ्या

जमिनीच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे दस्तावेज अर्थात कागदपत्रे असतात. यामध्ये आपण जर विचार केला तर हक्क सोडपत्र तसेच खरेदी खत मृत्युपत्र इत्यादींचा उल्लेख करता येईल. त्यासोबतच बक्षीस पत्र हे देखील एक महत्त्वाचा कागदपत्र असतो आणि त्याला आपण गिफ्ट डिड असे देखील म्हणतो.

बक्षीस पत्र हे एखाद्या जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा कागदपत्र असून मृत्युपत्र हे कागदपत्र सोडल्यास बाकी कागदपत्रांची अंमलबजावणी या असतानाच होत असते. जवळील नात्यामध्ये तसेच प्रेमखातीर आपुलकी केला जाणार आहे जे काही बक्षीस पत्र असतात. याबद्दल कायदेशीर तरतुदी या ट्रान्सफर प्रॉपर्टी एक्टरच्या कलम 122 व 126 मध्ये नमूद केलेल्या आहेत याच्या अनुषंगाने या लेखांमध्ये बक्षीस पत्राबद्दल काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

बक्षीस पत्र म्हणजे नेमके काय?

बऱ्याचदा रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना संपत्ती बक्षीस प्रमाणे दिली जाते व यामध्ये भविष्यात काही वाद विवाद होऊ नये याकरिता कायदेशीर रित्या बक्षीस पत्र तयार करून घेणे कधीही फायद्याचे असते. साहजिकच आपण जेव्हा आपण बक्षीस पत्र बनवतो त्याकरिता मुद्रांक अर्थात स्टॅम्प ड्युटी भरणे देखील गरजेचे असते.

मुद्रांक शुल्क भरल्यानंतर बक्षीस पत्राचे नोंदणी स्थानिक दुय्यम निबंध कार्यालयांमध्ये करणे गरजेचे असते व ही नोंदणी केल्यानंतरच बक्षीस पत्राला कायदेशीर मान्यता अथवा वैद्यता मिळते. म्हणजे साधारणपणे रक्ताच्या नात्यांमध्ये संपत्तीचे अथवा मालमत्तेवर करताना भविष्यामध्ये वाद उद्भवू नये त्या अनुषंगाने बक्षीस पत्राचे कायदेशीर प्रक्रिया केली जाते.

हे वाचा-  मोबाईल वरून अशी करा जमिनीची कराणी | how to measure land area

मालमत्तेचे बक्षीस पत्र केल्यानंतर त्या बक्षीस पत्राचे रजिस्टर निबंध कार्यालयामध्ये कर्म गरजेचे असते व त्या ठिकाणी ती होते. जेव्हा आई-वडील त्यांच्याकडून मुलासाठी बक्षीस पत्र करून दिले जाते तेव्हा कागदपत्रांमध्ये भविष्यात मुलांना हस्तांतरित केली जाणारी मालमत्ता अथवा मिळकत ही आई वडिलांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये असे देखील यामध्ये नमूद केले जाते.

जमीन बक्षीस पत्र म्हणजे एखादी व्यक्ती आपली जमीन स्वेच्छेने आपल्या कुटुंबातील सदस्यांना बीड म्हणून देण्याचा कागदपत्रे करार आहे. या कराराद्वारे जमिनीचा मालकीण नको एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतो.

बक्षीस पत्र का करावे?

वादाची शक्यता एक कमी: जमीन बक्षीस पत्र करून आपण भविष्यात होऊ शकणाऱ्या वादांची शक्यता कमी करू शकतो. बक्षीस पत्र नोंदणीकृत असल्याने ते कायदेशीर दृष्ट्या मान्य असते. काही प्रकरणांमध्ये जमीन बक्षीस पत्र करून कर बचत करता येते.

जमीन बक्षीसपत्र व्यवहार

आपण आपल्या मालकी हक्काची जमीन इतर कोणास कायमस्वरूपी देतो. तेव्हा त्या जमीन व्यवहारास बक्षीस पत्र असे म्हणतात.

रजिस्ट्री करताना काय काळजी घ्यावी?

बक्षीस पत्र रजिस्ट्रीमध्ये बक्षीस कोणाला देत आहोत त्या व्यक्तीचे आपल्याशी नाते आणि स्पष्ट कारण लिहिणे महत्त्वाचे आहे.

जमीन बक्षीस पत्र करताना काय काळजी घ्यावी

जमीन बक्षीस पत्र करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण करावी. बक्षीस पत्र नक्कीच नोंदणी करावे सर्व पक्षांची सहमती असणे आवश्यक आहे.

हे वाचा-  गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे get owner details from vehicle number

बक्षीस पत्र करण्याच्या काही अटी

  1. मालकी हक्काचे हस्तांतर केले जाणे आवश्यक.
  2. जी मालमत्ता अस्तित्वात आहे तिचे बक्षीस पत्र करता येते.
  3. हस्तांतर विना मोबदलाच केले जावे.
  4. हस्तांतर ऐच्छिकपणे असावे.
  5. असे असताना तर देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या हयातीत किंवा देणाऱ्याच्या मृत्यूनंतर होऊ शकते.
  6. जो बक्षीस देणारा आहे तो सक्षम व्यक्ती असावा.

बक्षीस पत्र देण्याची प्रक्रिया

  • मालमत्तेचे बक्षीस पत्र करण्यासाठी नोंदणीकृत दस्तावेज करण बंधनकारक असते.
  • देणारा आणि घेणाऱ्याच्या तसेच दोन साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे.
  • एक कायदेशीर सल्लागारा द्वारे बक्षीस पत्र तयार करून घ्यावे.
  • बक्षीस पत्रावर मुद्रांक शुल्क भरावे.
  • बक्षीस पत्र नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी.
  • सर्व पक्षांनी बक्षीस पत्रावर स्वाक्षरी करावी.

कायदेशीर सल्ला:

जमीन बक्षीस पत्र हा एक गुंतागुंतीचा कायदेशीर प्रवास आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कायदेशीर सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. जमीन बक्षीस पत्र हा आपल्या जमिनीचा मालकी हक्क कायदेशीर पद्धतीने हस्तांतरित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या प्रक्रियेत कायदेशीर सल्ला घेणे विसरू नका.

बक्षीस पत्र रद्द करता येते का?

काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकते. समजा एखादी घटना किंवा काही गोष्टी घडली तर बक्षीस पत्र बनवताना जर बक्षीस पत्र करून देणारा आणि ज्याला बक्षीस पत्र करून दिले जात आहे म्हणजेच लाभार्थी यांनी ठरवले असेल एखादी घटना किंवा एखादी विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीस पत्र रद्द होईल आणि तसेच घटना अथवा गोष्ट जर घडली तर बक्षीस पत्र रद्द होऊ शकते. परंतु यामध्ये एखादी विशिष्ट अशी गोष्ट करणे किंवा न करणे यावर डोनर अर्थात दात्याचे नियंत्रण असेल तर हे असे बक्षीस पत्र रद्द करता येत नाही.

हे वाचा-  गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे get owner details from vehicle number

Leave a Comment