व्हॉट्सॲप ग्रुप

कडबा कुट्टी यंत्र अनुदान योजनेसाठी महाडीबिटी मार्फत अर्ज प्रकीया

शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अधिक आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी शेती व्यवसायाबरोबरच गाई म्हशी शेळी मेंढी गुरे-ढोरे पालन करत असतात. आजही मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी व इतर जनावरे आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी लागते.

आधुनिक काळातसुध्दा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी शेळ्या अथवा इतर पाळीव पशु, प्राणी असतात. शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून अथवा जमिनीसाठी शेणखत, दूधदुपत होईल हा विचार करून पशुचा, जनावरांचा सांभाळ करत असतो.ज्या शेतकऱ्यांकडे गाय म्हैस,शेळी अशी गोरे-ढोरे आह त्यांना जनावरांना चारा-पाणी नीटनेटका करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीपण एक शेतकरी असान व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्याकरिता शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.

अर्ज कसा करावा?

कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के ते 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जाते, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा 16 हजार रुपयापर्यंत आहे.

हे वाचा-  Union Bank Personal Loan: 20 मिनिटांत 50 हजार रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा अप्लाई ऑनलाइन

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • तुमच्या घराचे वीज बिल
  • जातीचा दाखला (आरक्षण असल्यास)
  • बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  • (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक)
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीनची किंमत (Price) सामान्यता:

10 हजारापासून 40 हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती (3HP,5HP) यानुसार कडबा कुट्टी मशीनची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीनही मानवचलित व स्वंयचलित अशा दोन प्रकारचा मशीन आहे. मानवचलित मशीनही स्वस्त तर स्वयंचलित कडबा कुट्टी यंत्र महागडे असते.

कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits)आहेत.

जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या मदतीने जलद गतीने व खराब न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या मदतीने चारा कट केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.

अर्ज सबमिट करा:

सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासल्यानंतर, अर्ज सबमिट करा.अर्जाची प्रिंटआउट घेऊन सुरक्षित ठेवा.

महत्त्वाची सूचना:

  1. कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान मिळविण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. अर्जदार शेतकरीकडे स्वतःच्या नावावर १० एकरपेक्षा कमी शेती जमीन असावी.
  3. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
  4. घरगुती वीज कनेक्शन अर्जदाराच्या किंवा कुटुंबप्रमुखाच्या नावावर असावे.
हे वाचा-  Kadba Kutti Machine Yojana 2025: कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना, तब्बल 20 हजार रुपयांपर्यंत मिळेल अनुदान

Leave a Comment