जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करत असाल किंवा तुम्हाला तुमच्याशी जमिनीची मोजणी करायची असेल तर हे काम तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता.
यामध्ये जी पी एस आणि मॅन्युअल पद्धतींचा वापर केला जातो. यासाठी अनेक ॲप्स अँड्रॉइड साठी गुगल प्ले स्टोअर तर आयओएस साठी एप्पल ॲप स्टोअर वर उपलब्ध आहेत.
मोबाईल ॲप द्वारे जमीन मोजणी कशी करावी?
- Play Store मध्ये Google map calculator असे सर्च करा.
- Google map calculator असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर बरीच एप्लीकेशन दिसतील. त्यामधून तुम्ही जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
- GPS area calculator app install झाल्यानंतर ॲप उघडा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचा GPS सुरू करा.
- त्या ठिकाणी तुमच्यासमोर एक पेज उघडेल. तुमच्यासमोर एक संपूर्ण नकाशा येईल त्या ठिकाणी तुमचे राज्य,जिल्हा व तालुका टाकून तुम्ही सर्च करा.
- नकाशावर जिथे तुमची जमीन दिसत आहे त्याच्या चारी बाजू सिलेक्ट करा.
- यामध्ये तुम्ही जमीन मोजणीचे परिमाण वापरून अगदी तंतोतंत आणि अचूक जमिनीची मोजणी करू शकता.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन मोजणी करताना मोजणीसाठीचे परिमाण स्क्वेअर फिट किंवा स्क्वेअर मीटर निवडा.
- अशाच पद्धतीने तुम्ही तुमची जमीन हेक्टर मध्ये सुद्धा मोजू शकता.