व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Pm free electricity scheme पीएम सूर्यघर योजना संपूर्ण माहिती.

पीएम सूर्यघर योजना. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम सूर्य घर योजना ही सर्वसामान्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होणार आहेत तर ते फायदे कसे होणार आहेत आपण पाहणार आहोत. या योजनेबद्दल एक थोडक्यात सांगायचे झाले तर यामध्ये आदरणीय नरेंद्र साहेब मोदी यांनी भारतातील एक कोटी घरांवरती या पी एम सूर्यग्रहण योजनेअंतर्गत सोलार पॅनलचे इन्स्टॉलेशन करण्याचे ठरविले आहे.

त्या मार्फत सर्व नागरिकांना ही मोफत वीज मिळणार आहे तसेच ते नागरिक ती वीज इतर उद्योग धंद्यासाठी ही विकून शकतात. किंवा घर कामासाठी ते वापरू शकतात त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या पीएम सूर्य घर योजनेचा फायदा फायदा होणार आहे तर तो फायदा कशाप्रकारे होणार आहे काय होणार आहे ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

  • या योजनेचे मुख्य मुद्दे
  1. मोफत वीज योजना म्हणजे काय
  2. दोन किलो वॅट सोलर सिस्टिम लावण्यासाठी किती खर्च येईल माहितीसाठी खालील क्लिक करा.
  3. योजनेची विशेष वैशिष्ट्ये
  4. पी एम सूर्यघर योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
  5. पीएम सूर्य घर योजनेची अधिक माहिती.
  6. पीएम सूर्य घर योजना काय आहे.

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकारअनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील.

एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेस सारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूट ऑफ सोलार सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मोफत वीज योजना म्हणजे काय?

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनाही भारत सरकारने सुरू केलेली असून महत्त्व आकांक्षी योजना आहे. रूट ऑफ सोलार द्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे.

2 किलो व्हॅट सोलर सिस्टिम लावण्यासाठी किती खर्च येईल माहितीसाठी क्लिक करा.👇

Pm सूर्य घर योजना ची वैशिष्ट्य संकल्पना

  • 1 घरगुती वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
  • 1ते3 किलोवॅट 40 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • 3 ते 4 किलोवॅट पेक्षा जास्त ते 10 किलो वॅट पर्यंत 40 टक्के अनुदान मिळणार आहे.

Pm सूर्य घर योजनेमुळे होणारे फायदे

पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकारद्वारे एक कोटी घरावर सोलर एनर्जी पॅनल लावले जाणार आहेत. अशी माहिती ही अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली होती या योजनेअंतर्गत सोलार पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेमध्ये सहभागी केले जाणार आहे. ही योजना समाजातील मध्यमवर्गीय तसेच गरीब व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेचे पात्रता काय आहे

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या घराच्या छतावर सोलार सिस्टीम बसविण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • लाईट बिल
  • पत्त्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक

तरीही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तुम्हाला जर पीएम सूर्य घरी येण्यासाठी अर्ज करण्याचा असेल तर तुम्ही या ठिकाणी खाली तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करू शकता ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे तसेच अर्ज करण्याची वेबसाईट ही खाली दिलेली आहे.

अर्ज कुठे करायचा व कसा करायचा?

तर पीएम सूर्य घर या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही आपले रजिस्ट्रेशन करू शकता. त्या संकेतस्थळाची लिंक आम्ही या ठिकाणी खाली देत आहोत तर तेथे जाऊन तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचे आहे.

पीएम सूर्य घर योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇

Step 1

  • पोर्टलवर खाली सह नोंदणी करा.
  • वितरण कंपनी निवडा
  • तुमचे राज्य निवडा
  • तुमचा विज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
  • मोबाईल नंबर घाला.
  • ई-मेल भरा.
  • पोर्टलच्या सूचनेचे पालन करा

Step 2

  • ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर सह लॉगिन करा.
  • फॉर्म नुसार रूम स्टॉप सोलर साठी अर्ज करा

Step 3

  • Discom कडून व्यवहारता मजुरीची प्रतीक्षा करा. एकदा तुम्हाला व्यवहारता मजुरी मिळाल्यावर तुमच्या discom मध्ये कोणत्याही विक्रेत्याकडून प्लंट स्थापित करा.

Step 4

  • एकदा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांट चे तपशील सबमिट करा आणि नेट मीटर साठी अर्ज करा.

Step 5

  • नेट मीटर बसवल्यानंतर आणि discom द्वारे तपासणी केल्यानंतर ते पोर्टल वरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करू शकतील.

Step 6

  • तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टल द्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमित करावा. तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ती दिवसाच्या आत तुम्हाला मिळेल.

या योजनेचे निष्कर्ष

पी एम सूर्य घर या योजने अंतर्गत ज्या नागरिकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये त्यांना एक ते तीन किलो वॅट पर्यंत सोलार पॅनल त्यांच्या घरावरती लावण्यासाठी 40 टक्के अनुदान मिळणार आहे तसेच तीन ते चार किलो वॅट पेक्षा जास्त सोलर पॅनल त्यांना लावायचे असल्यास २० टक्के अनुदान हे सरकारकडून देण्यात येणार आहे यातूनच ते त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विजेची पूर्तता करून शिल्लक राहिलेली वीज ही इतरांना विकू शकतात व त्यातून चांगला नफा कमवू शकतात.

Leave a Comment