व्हॉट्सॲप ग्रुप

पीएम विश्वकर्मा योजना | खराब सिबिल स्कोर असेल तरीही मिळणार या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार, आज आपण या लेखामध्ये खराब सिबिल स्कोर वर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कसा घ्यायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Low cibil score loan: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 2023 रोजी केली होती.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकार मार्फत संपूर्ण देशामध्ये राबवली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत देशातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हस्तकला आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून किंवा वाढवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे ज्या लोकांचे ध्येय आहे, पण ज्यांचा सिबिल स्कोर खराब आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फायदे

उद्दिष्टे आणि महत्त्वप्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे कारागीर आणि लहान व्यवसायिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे हे आहे. या योजनेअंतर्गत सरकार विविध प्रकारची खर्चे प्रदान करत असते, जेणेकरून लोक त्यांचा व्यवसाय व्यवस्थित रित्या स्थापित करून आर्थिक आणि सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ शकतील.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व हे आहे की, ज्यांना बँकांकडून खराब सिबिल स्कोर वर कर्ज मिळू शकत नाही अशा लोकांना या योजनेमार्फत कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना केवळ आर्थिक मदतीबरोबरच लोकांना स्वावलंबी बनवण्याची संधी देखील देते.

हे वाचा-  मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची तारीख उघड असे करा अपडेट.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कर्जाची रक्कम, कालावधी व व्याजदर

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 5 ते 7 वर्षाच्या कालावधीसाठी 6% ते 12% वार्षिक व्याजदराने कारागीर व छोटे व्यापारी यांना दिली जाते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कर्ज मिळवण्यासाठीची संबंधित क्षेत्रे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती ही खाली दिलेल्या संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.

योजनेचा अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया

अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तपासणीसाठी पाठवला जातो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन कमिटी तुमच्या अर्जावर अंतिम निर्णय घेते. मंजुरी मिळाल्यावर तुम्हाला PM Vishwakarma Certificate आणि ID Card मिळते, जे तुमच्या व्यवसायाला अधिकृत ओळख देते. यानंतर तुम्ही कर्ज, ट्रेनिंग, आणि इतर लाभांचा फायदा घेऊ शकता

Leave a Comment