व्हॉट्सॲप ग्रुप

रेशन कार्ड e-KYC करण्याची अंतिम तारीख जाहीर

रेशन कार्ड e-KYC ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्डची माहिती आधार कार्डशी जोडली जाते. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) ही प्रक्रिया अनिवार्य आहे. याचा मुख्य उद्देश आहे फक्त पात्र लोकांनाच रेशन योजनेचा लाभ मिळावा आणि बनावट रेशन कार्ड किंवा चुकीच्या नोंदींना आळा बसावा.

थोडक्यात सरकारला खात्री करायची आहे की रेशनचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतोय.तुम्ही जर रेशन कार्डद्वारे दरमहा मोफत किंवा कमी किंमतीत धान्य घेत असाल, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं e-KYC करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं नाव रेशन कार्डच्या यादीतून काढलं जाऊ शकतं आणि मग रेशनचा लाभ मिळणार नाही.

e-KYC स्टेटस कसं तपासायचं?

तुम्ही e-KYC केलं असेल आणि त्याचं स्टेटस तपासायचं असेल, तर तेही सोपं आहे. यासाठी:

  • तुमच्या राज्याच्या PDS पोर्टलवर जा.
  • तुमचा रेशन कार्ड नंबर टाका.
  • Check e-KYC Status पर्याय निवडा.
  • तुम्हाला तुमच्या KYC ची सद्यस्थिती दिसेल (उदा. पूर्ण प्रलंबित किंवा अपयशी).

घरबसल्या मोबाईलवर Ration Card e-KYC करण्याची सोपी आणि step by step प्रक्रिया

यापूर्वी लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन KYC करावी लागत होती, पण आता ही प्रक्रिया तुमच्या हातातल्या मोबाईलवरून घरबसल्या करता येते.

हे वाचा-  संपूर्ण गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा जाणून घ्या Village Land Map Online

Ration Card e-KYC संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

  1. ही सुविधा सध्या फक्त महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे.
  2. महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांनी IMPDS KYC पर्यायाचा वापर करावा.
  3. e-KYC करण्यासाठी आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.
  4. रेशन दुकानदारांनी देखील लाभार्थ्यांना सहकार्य करून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

रेशन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्ड काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला (सातबारा उतारा, वीजबिल)
  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे)
  • १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन

रेशन कार्डामधील नाव समाविष्ट करणे

रेशन कार्डामध्ये विवाहित महिलांचे किंवा लहान मुलांची नावे करण्यासाठी काही प्रमाणपत्रे आवश्यक असता

  • विवाहित महिला:लग्नानंतर नवऱ्याच्या घरी आलेल्या महिलेचे नाव समाविष्ट करण्यासाठी माहेरच्या रेशन कार्डातून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र दाखवून नवऱ्याच्या कुटुंबाच्या रेशन कार्डामध्ये तिचे नाव समाविष्ट केले जाते
  • .लहान मुले:घरातील लहान सदस्यांचे नाव रेशन कार्डामध्ये समाविष्ट करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो.

अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना

अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना यांतर्गत रेशन कार्डधारकांना अतिरिक्त लाभ मिळतात:

  • अंत्योदय योजना: या योजनेत लाभार्थींना प्रति कार्डावर महिन्याला २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू असे एकूण ३५ किलो मोफत धान्य मिळते.
  • प्राधान्य कुटुंब योजना: या योजनेत प्रति कार्ड ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मोफत मिळतात.
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब: या कुटुंबांना पूर्वी मोफत धान्य दिले जायचे. आता त्यांना प्रति माणसी १५० रुपये रोख डीबीटीमार्फत थेट अनुदान खात्यात जमा केले जाते.
हे वाचा-  1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे ऑनलाइन पाहा – कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शन

ऑनलाइन अर्ज कसा करावा

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या ऑनलाइन सुविधा केंद्रात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा www.rcms.mahafood.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करता येतो. अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत आणि संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे एकदा फोटो व्हेरिफिकेशन करावे लागते.

Leave a Comment