व्हॉट्सॲप ग्रुप

शेळी-मेंढी गट वाटप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

अर्ज कसा करायचा?

शेळी-मेंढी गट वाटप योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे. खालील पायऱ्या फॉलो करा:

  1. कागदपत्रे गोळा करा:
  • आधार कार्ड
  • सात-बारा उतारा
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला (SC/ST साठी)
  • बँक पासबुक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  1. अर्ज फॉर्म मिळवा:
  • जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, तलाठी कार्यालयातून फॉर्म घ्या.
  • किंवा महाराष्ट्र शासनाच्या mobile app किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा.
  1. अर्ज भरा:
  • फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडा.
  1. अर्ज जमा करा:
  • ऑफलाइन: जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जमा करा.
  • ऑनलाइन: apply online सुविधेद्वारे वेबसाइटवर अपलोड करा.
  1. तपासणी आणि मंजुरी:
  • अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी होईल.
  • मंजुरीनंतर शेळी/मेंढी गट वाटप केला जाईल.
  1. अनुदान जमा:
  • अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
गटाचा प्रकारएकूण खर्च (रुपये)SC/ST अनुदान (75%)सर्वसाधारण अनुदान (50%)
शेळी गट (उस्मानाबादी)1,03,54577,65951,773
मेंढी गट (माडग्याळ)1,28,85096,63864,425

टीप: अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. यशस्वी अर्जदारांना प्रशिक्षणही मिळेल. Apply online सुविधेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.

हे वाचा-  Google maps वर सहज ऍड करू शकता तुमचे घर, दुकान आणि ऑफिस

Leave a Comment